4.03.2006

काही मराठी चारोळ्या ....

जीवनावर हसता हसता
एक अश्रू डोळ्यात तरळला,
बरसण्याआधी हा मेघ
गडगडायला कसा विसरला || १ ||

आजकाल तिचे डोळे
माझ्याशी बोलत नाहीत,
त्यांची समजूत कशी काढू
माझे मलांच कळंत नाही || २ ||

कधी कधी खरंच वाटतं
मागावी गणूकडे आईएवढी सोशीकता;
सगळं हसत हसत सहन करण्यासाठी || ३ ||

सवय पडत होती काही गोष्टींची
पण आता सारं काही संपलं आहे;
यातना आहेत काही सवयींच्या
पण त्यांची ही हळू हळू सवय पडेल || ४ || ..... :) आवडलं आपल्याला !!

चालतो आहे एकटांच स्वत:च्या शोधात;
सापडल्यात कही सावल्या, पण एक ही जुळेना || ५ ||

~ ह्र षि के श . . .

3 comments:

Y3 said...

सुरेख..

छान आहेत चारोळ्या... शेवटची विशेष आवडली..
शुभेच्छा.
यतीन

Anonymous said...

sahi re.. tuza ha guN mala mahit navhata

Anonymous said...

छान.. आणखी असतील तर लवकर पोस्ट कर इथे..