4.23.2006

जोगिया ....

ती जोगिण दुस-याची
तो जोगिया तिचा,
आयुष्याच्या लपंडावात
पराभव मात्र नेहमिच त्याचा ...

असतील कमी स्वत:त काही
समजावतो तो मनाला,
हरल्याचं शल्य मात्र
टोचतंय त्याला क्षणा क्षणाला ....

आयुष्याच्या ऎन मध्यावर
थबकला तो काही क्षण,
विसरून जाईल सारं काही
केला असा मनाशी पण ...

पण केला तर खरा
पण पूर्ण काही होईना,
तिची आठवण आल्याखेरीज
त्याचा एक दिवस जाईना ...

आता असंच कुढंत खुपत
ईथुन पुढे तो जगत रहाणार,
केवळ श्वास चालू आहेत म्हणून
जीवन त्याला म्हणत रहाणार .....


~ ह्र षि के श

No comments: