नि:शब्द समुद्र, निश्चल वारा, निष्पर्ण झाडं, कोरडा सूर्य ! सारं सारं काही बदलले आहे ! पूर्वीची ती वाटही हरवली वाटत कुठतरी ... आता पुढे जाऊ तरी कसा ?
अरे या पक्षाच घरटं ही दिसत नाही काहितरी चुकतं आहे !
माझ्या सगळ्या खुणा कोणितरी लपवून ठेवल्या आहेत वाटतं ...
तो दुरवर उडणारा तोच का तो पक्षी?
नाही त्याच्या डोळ्यात नाही आहेत ती स्वप्नं आभाळ पंखांवर पांघरून घेण्याची ! मीच चुकलो आहे वाटतं ...
हे माझं जग नाही ! या समुद्राच्या तोंडावरची सुरकुती पण हलत नाही आहे माला पाहून !
एरवी माझ्या तळपायाला गुदगुल्या करणारी त्याची मुलायम रेती आज चटके देते आहे मला ...
एरवी कानात शीळ घालणारा वारा आज का माझा श्वास गुदमरून टाकतो आहे? या झाडाची तर सावलीच पडत नाही आहे ...कसं शक्य आहे? स्वप्न तर नाही ना हे?
श्वास संपण्याआधी पळावं इथून ... पण कुठे? कोणत्या दिशेला?
हा सूर्य पण कदाचित उत्तरेहून आला असेल वर अला चुकवायला ...
तो वर आकाशात दिसतो आहे तो गणूंच आहे का माझा?
मग हसतो का आहे तो माझ्यावर? हवंय तरी काय त्याला माझ्याकडून?
तो बोलतोय कहितरी ... मग मला का ऎकू येत नाही आहे?
चालत रहायला सांगतो आहे तो मला कदाचित!
कदाचित खुणावत असेल योग्य दिशेकडे!
सांगत आसेल कदचित की हेच आहे माझं प्राक्तन कपाळावर कोरलेलं ....
मी कधी वाचू नं शकलेलं ...
माझ्या हातात आता काय आहे तर फक्त चालत रहणं ...
चटके सोसत, सूर्याबरोबर, त्या पक्षाच्या घरट्याच्या शोधात, अंतापर्यंत .....
~ ह्र षि के श . . .
4.05.2006
Subscribe to:
Post Comments (Atom)

2 comments:
सुरेख कवीता आहे...
तुझ्या आणि माझ्या ब्लोग च नाव सारख आहे.. ते बघूनच तुझ्या ब्लोगवर आलो...
शुभेच्छा.
यतीन
हे असच लिहिताना जाम चाचपडायला होतं ना पण? :)
लिखाण आवडल
Post a Comment