9.10.2007

जिंकणं जरूरी आहे .....

किती सोपं असतं जर हरण्याची अट नसती ...
केलं ही असतं सगळं मनाच्या तालावर ... अश्क्यातलं काही ... स्वप्नांत पाहिलेलं !!

पण अट कायम होती ... अन हरणं मनात होतं ..
हरल्या मनानं नाही घडल्या काही गोष्टी स्वप्नातल्या ...
राहून गेल्या त्या तश्याच अंधा-या कोप-यात ... चाचपडत ...प्रकाशाची वाट पहात !!

अखेर एक दिवस आला नशिबी त्यांच्या प्रकाशाचा एक किरण ....
पुन्हा जगावंस वाटू लागलं मनाला ... न हरता ... काही जिंकण्यासाठी

जिंकावंस वाटलं स्वत:साठी चार नभांच आपलं म्हणता येईल अस आभाळ ...
जिंकावंस वाटलं आपलंस कोणीतरी .. आभाळ संपेपर्यंत बरोबर असण्यासाठी
जिंकावंस वाटलं आपल्या कोणासाठी तरी ... त्यांच्या जिंकण्यासाठी
जिंकावंस वाटलं आपल्याच अस्तित्वासाठी ... कोणाचं तरी सर्वस्व होण्यासाठी ...
जिंकावंस वाटलं मनातून हरणं काढण्यासाठी ... कारण तिथॆ आता कोणितरी येणार होतं ... आपलंस .. आभाळ संपेपर्यंतच्या सोबतीसाठी !!

~ हृषिकेश

9.09.2007

बावरा मन देखने चला एक सपना ....

Cheers to Swanand Kirkire for giving this song !!!


बावरा मन देखने चला एक सपना ....
बावरे से मन की देखो बावरी है बातें, बावरी सी धड़कने है बावरी है सांसे,
बावरी सी करवटो से निंदिया क्यों भागे
बावरे से नैन चाहे बावरे झरोकों से बावरे नजरोको तकाना .....
बावरा मन देखने चला एक सपना !!

बावरे से इस जहा में बावरा एक साथ हो, इस सायानी भीड़ में बस हाथोमें तेरा हाथ हो,
बावरी सी धुन हो कोई बावरा एक राग हो , बावरे से पैर चाहे बावरे तरानोके बावरे से बोल पे थिरकना ...
बावरा मन देखने चला एक सपना !! १ !!

बावरा सा हो अंधेरा बावरी खामोशिया, थरथराती नौ हो मद्धम बावरी मदहोशिया ..
बावरा एक घुंघटा चाहे, हौले हौले बिन बताये, बावरे से मुखडे से सरकाना .....बावरा मन देखने चला एक सपना !!२ !!

9.05.2006

खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?

Amazing Song by Prashant Damle, ashakya lihila ahe he !!!

खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं !!

सुख म्हणजे दुख्खाचा उरलेला गंध
रडता रडता हसण्याचा आवडता छंद,
मन पाखरू हे जगण्यासाठी
आसुसलेलं असतं ..

खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं

सुख म्हणजे मृगजळ, सुख म्हणजे पारा
सुख म्हणजे शब्द बापुडा, केवळ वारा,
कुठल्या क्षणी मुठ्ठीमधूनी
निसटून जात असतं ..

खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं .............

4.23.2006

जोगिया ....

ती जोगिण दुस-याची
तो जोगिया तिचा,
आयुष्याच्या लपंडावात
पराभव मात्र नेहमिच त्याचा ...

असतील कमी स्वत:त काही
समजावतो तो मनाला,
हरल्याचं शल्य मात्र
टोचतंय त्याला क्षणा क्षणाला ....

आयुष्याच्या ऎन मध्यावर
थबकला तो काही क्षण,
विसरून जाईल सारं काही
केला असा मनाशी पण ...

पण केला तर खरा
पण पूर्ण काही होईना,
तिची आठवण आल्याखेरीज
त्याचा एक दिवस जाईना ...

आता असंच कुढंत खुपत
ईथुन पुढे तो जगत रहाणार,
केवळ श्वास चालू आहेत म्हणून
जीवन त्याला म्हणत रहाणार .....


~ ह्र षि के श

4.19.2006

हरवलंय सारं ....

हरवलंय सारं, जे अनुभवलं होतं कधी..
आता आहेत केवळ आठवणीं,
काही कडू काही गोड ...

आठवतात अजून ते
आजीच्या हातचे दहिपोहे,
घुमतात आजुनही कानात
देवघरातले आजोबांचे दोहे ...

दरवळतो आहे अजून हवेत
बागेतल्या त्या पहिल्या मोग-याचा सुगंध,
पावसात चींब भिजलेल्या धरेचा
तो सुखावणारा परिमल मंद ...

आंबले आहेत दात अजून
त्या हिरव्याकंच कैरिने,
भिजून शहारलंय मन आतुर
श्रावणातल्या त्या पहिल्या सरीने ...

कुठे गेल्या त्या संध्याकाळच्या
शुभंकरोति अन रामरक्षा,
हरवला का तो वासुदेव
अन त्याला दिलेली भिक्षा ...

पण खात्री आहे मला,
सापडतील सगळ्या गोष्टी हरवलेल्या ...
तो आजीचा हस्तस्पर्श, ते दहिपोहे, देवघरातले दोहे, त्या टवटवीत मोग-याचा गंध ...

परत घेवून जाईल मला तोच दरवळणारा मॄदगंध
माझ्या हरवलेल्या घराच्या दिशेने ....

~ ह्र षि के श

4.08.2006

२००३ चे सीमोलंघन ...

आई आई ग ... काही नही जरा कळ आली......
नाक्की कुठुन आली ते मला पण नही कळत आहे पण अधुन मधुन अशा कळा येत अहेत वा तसें भास होताहेत! असो ..

तर या शुक्रवारी आम्ही म्हणजे समस्त कळपवासी (२ गवे वगळता) आणि अजुन एक महारष्ट्र मंडळातले होवू घातलेले जोडपे ( मंदार आणि आदिती) असे ८ जण एक ट्रेक ला जायला निघालो ( संत्या आता कळपातला एक गवा झाला आहे ) ... (ता. क. मंदार आणि आदिती आता "Happily Married Couple"आहेत. )

बंगलोरहून रात्री ११ ची बस होती ... त्याने कुक्के-सुब्रमण्यम ला गेलो ... ईथे सकाळची सगळी कामे उरकून देवचे बहेरुनच दर्शन घेउन बशीने एक ठिकाणी आलो ... नाव डोक्याला खूप उन लागल्याने आठवत नही...







ईथून आमची गाडी "TRACK" वर आली ...






नंतर वाटेत अनेक "BRIDGES" आणि "TUNNELS" पार करत करत आम्ही पुढे जात होतो ...






त्यानंतर साधारण ९.३० ला सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले ...
मग जनता खाली बसली ...





(वरील फोटोमध्ये लोकांच्या तोंडावरचे हासू हे ३-३ अंडी, २-२ बन पाव आणि १/२ - १/२ लिटर दूध पिल्यामुळे आहे ... अन्यथा लोकांची अवस्था बघवत नव्हती ..)
खावून झाल्यानंतर आमचा वेग मंदावला नही तर दूणावला ... पुढचे २ Patches मी ,संत्या , निलेश आम्ही लै लै जोरात मारले ... आता सगळे जाणवते आहे ...असो
त्यानंतर थेट जेवण करायला ठेपलो ... ठेपले खाल्ले लोणच्याबरोबर ... दसरा म्हणून "गुलाबजाम" ही होते ... मजा आली ... जेवणानंतर लिचेस मारायचा सामुहिक कार्यक्रम झाला ...नंतर एक फोटोसेशन (होवू घातलेल्या नवरा बायकोचे वेगळे :) )








( बरोबर ओळखले !!! गागावले घातलेला संत्याच आहे)



ह्यानंतर आमच्या ८ लोकत २ गट पडले ...
१) पती, पत्नी और वोह ( शेरपा वा बहाद्दुर )
२) ईतर मंडळी ( बहुतेक सगळी चावरी आणि खौट )
नंतरचा प्रवास जरा कठीण होता. आमच्या Sacks जरी विशेष हलक्या झाल्या होत्या तरी शरीरे जड झाली होती. तरी इतर मंडळी जातच होती. त्यांच्याकडे एकही Torch नव्ह्ता. Tunnels पार करायला ... त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांच्या sacks पकडून एक छोटिशी ५ डब्यांची आगगाडी तयार केली आणि प्रत्येक बोगद्यातून रुळावरून घसरवली ... ( गडी DERAIL झाली नाही तरी एक डबा मात्र झोकांड्या खात होता)


(Engine आणि Engine Driver !!)




आता आमच्या म्हणजे इतर मंडळी आणि गट १ यांचा असा गैरसमज होता की आपण बोगदा क्रमांक २५ ओलांडला की आलो "येडकुमेरी" ला ... पण अखेर एका बोगद्यात आमचे डोळे उघडले ... लख्ख प्रकाश पडला .. बोगद्यात नही आमच्या डोक्यात .. आणि असे कळाले की अजुन १० बोगदे पार करायचे आहेत ... इथून पुढचा प्रवास अवर्णनीय आहे ... तो केवळ अनुभवला तरच त्याची मजा कळेल .. आम्हाला खूप मजा आली काय रे मुलान्नो आली ना?
आता प्रेत्येक बोगद्याच्या टोकाला दरडी आणि झाडे कोसळलेली असायची ... त्यातच एक आपट्याचे झाड होते .. त्याची शुष्क पाने एकमेकांच्या तोंडाला पुसून I mean त्यांनी एकमेकांच्या तोंडाचा घाम पुसून आम्ही "दसरा साजरा" केला ...


( संतोषच्या तोंडावर Flash पडल्याने तो इतका गोरा दिसतो आहे !)










२ बोगद्यांच्या मध्ये काही अत्यंत विहंगम द्रुश्ये दिसली ...




























एक बोगदा बायपास करता करता आम्ही "ब्रिजसपाटीपासून" इतक्या खाली आलो की आचानक वर पाहिले तर २०० फुटांवर ब्रिज होता. मग काय सरळ एका ओहोळाच्या कडेकडेने वर चढलो ... य मजा आली आणि तितकीच फाटली ... आत येडकुमेरीचा सुर्व्या डुबल्यागत झाला होता ... त्यामुळे अजुन एक काळजी ... अंधाराच्या आत कहीही करुन सगळे ब्रिजेस आणि टनेल्स पार करायचे होते. नाही तर ... ? नको रे बाबा .....
पण शेवटी साडे ६ ला आम्ही ईष्ट स्थळी जाऊन पोहोचलो ( ३० कि.मि. चा पहिला टप्पा संपला)
तिथे गट १, १०-१५ मिनिटांपूर्वी येऊन पोहोचला होता. आमचा जीव भांड्यात पडला ... मग यथावकाश पायांवरच्या लिचा काढण्याचा कार्यक्रम झाला. हात, पाय, तोंड धून स्वच्छ झालो. थंडी वाजू लागली होती. पावसात भिजून ओले झालेले कपडे बदलले आणि चुलिवर पाणी तापवून कप-नुडल्स खाल्ल्या. शरिराचे सगळे भाग ठणकंत होते. मग कही जण पेन किलर्स घेऊन झोपले तर काही हमम....... थंडी वाजू नये म्हणून औषध ..
त्यानंतर कुमार संतोषला रात्री अचानक बाहेर जावे लागले ... त्यावेळी त्याने चपला उलट्या घातल्या होत्या ... असो ... औषधाचा परिणाम असावा हे जाणकार लोकांन्ना पटकन समजलं असेलंच ...सकाळी चुलिवर झकास पोहे आणि चहा केला ...





( संतोषचा चेहरा नही तरी डोळे बरेच काही संगून जात होते )








नदी पार करता येणार नही हे कळल्यामुळे आता अजुन किमान १५ तय १६ कि.मि. चालायचे होते.मग सगळे आवरून १०.३० ला निघालो...













उठंत बसत कसे तरी एकदाचे १५ टनेल्स पार केले आणि एका जागी येऊन विसावलो...






( दुधाची बाटली (पिशवी) तोंडाला लावलेला मंदूबाळ )





नंतर इथून ३ कि.मि. वर एकदाचा डांबरी रस्ता दिसला आणि इतका वेळ धरुन ठेवलेला अश्रुंचा बांध ( बांध कसला नदीच) फुटला. रस्त्यावर आलो न आलो तोच एक ४०७ आला ... त्यात मागे बसुन आम्ही सकलेशपूरला आलो. त्या गाडीत आमच्या बरोबर अनेक मासे पण होते खोक्यात बंद केलेले ... त्यांच वास थोड्या वेळ त्रास देऊन गेला आणि सकाळपासून आपण काय काय खाल्ले आहे याची जाणीव करुन देऊन गेला. मग एका होटेलपाशी उतरून काय मिळेल ते २-२ च्या हिशोबात हाणले...
एक लाल डबा धरून "हसन" नावाच्या गावी आलो ... तिथून सुमो करून घरी रात्री ११.३० ला पोहोचलो ....
गरम पाण्याने आंघोळ केल्यावर आपल्याला नक्की कुठे कुठे ओरखडे उठले आहेत ते कळले ...
असो ...
नंतर खिचडी खाऊन "गादी" वर झोपलो .. कूस बदलताना वेदनेची जणीव होत होती ... तरिही सकाळी उठून हापिसात आलो...
तर अश्याप्रकरे एक अत्यंत जीवघेण ट्रेक आम्ही पूर्ण केल ...
३ चिअर्स टु कळप आणि श्रि. व सौ. मंदू !!!!
हिप हिप हुर्रे!!!!!! हिप हिप हुर्रे!!!!!! हिप हिप हुर्रे!!!!!!


~ ह्र षि के श